मुंबई : झी २४ तासच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तरूण नवसंशोधकांना नुकताच यंग इनोव्हेटर अवॉर्डस् देऊन सन्मानित करण्यात आलं... मुंबई विद्यापीठाच्या कलिना विद्यानगरीत पार पडलेल्या शानदार सोहळ्यात तरूणाईच्या संशोधक बुद्धिमत्तेचा सन्मान करण्यात आला. इंग्रज एक कोहिनूर घेऊन गेले. पण महाराष्ट्राच्या भूमीत अनेक सजीव कोहिनूर आहेत, असं सांगतानाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी झी २४ तासच्या या उपक्रमाचं कौतुक केलं.


विद्यापीठात रिसर्च सेंटर 


नव्या संशोधकांसाठी मुंबई विद्यापीठ रिसर्च सेंटर सुरू करणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केली. तर प्लास्टिक बंदी हा उपाय नाही.. तर प्लास्टिकचा पुनर्वापर हा पर्याय आहे, असं इन्स्टिटूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी यावेळी सांगितलं.