दिल्लीचीही शान राखतो, 'सचिन' आमुचा!

 www.24taas.com, नवी दिल्ली

राजधानी दिल्ली तुम्ही लवकरच सचिन तेंडुलकर चौकाला भेट द्याल किंवा सचिन तेंडुलकर मार्गावरून आपली गाडी भरधाव घेऊन जाऊ शकतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दिल्ली महानगरपालिकेने या विक्रमवीराचे नाव एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला देण्याचे ठरवले आहे.

 

तसेच चांदनी चौकाचे नाव तेंडुलकर चौक करण्यात यावे, असा प्रस्ताव एका नगरसेवकाने दिला आहे.

 

सचिन तेंडुलकर याचा सन्मान करण्यासंबंधी सुमारे १०० प्रस्ताव आहे, परंतु या संदर्भात अद्याप निर्णय करण्यात आलेला नाही, असे दिल्लीच्या महापौर रजनी अब्बी यांनी यांनी सांगितले.

 

या संदर्भात चांदनी चौकाचे नगरसेवक सुमन कुमार गुप्ता यांनी चांदनी चौकाचे नाव बदलून तेंडुलकर चौक करण्यात यावे, असा प्रस्ताव दिला आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Home Title: 

दिल्लीचीही शान राखतो, 'सचिन' आमुचा!

No
23214
No