मुंबई : शास्त्रांमध्ये अनेक गोष्टी या शुभ मानल्या जातात. भारतीय लोकांचा या गोष्टींवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे अनेक जण अशा गोष्टी दिसल्या की त्या शुभ असल्याचं समजतात. पाहा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या शास्त्रानुसार दिसल्या की शुभ असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 गोष्टी दिसणं असतं शुभ


1. सफेद गाय :


हिंदू धर्मात गायला आईचा दर्जा दिला आहे. गाय ही आर्थिक सुदृढ़ीकरणाचं प्रतीक आहे. तुम्हाला जर कोठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन असल्याचं समजलं जातं.


2. नारळ :


नारळ हे भारतीय सामाजिक परंपरेत शुभ मानलं जातं. सकाळी उठताच जर तुम्हाला श्रीफळाचं दर्शन झालं तर समझा तुमच्यासाठी गुडन्यूज येणार आहे. 


3. प्रवास करतांना शुभ संकेत :


जेव्हाही तुम्ही कधी प्रवास करत असाल आणि तुमच्या उजव्या बाजूने माकड, कुत्रा किंवा साप दिसला तर ते तुमच्यासाठी आर्थिक फायदा होण्याचं संकेत आहे.


4. सोनेरी साप :


जर रात्री झोपतांना तुम्हाला सफेद किंवा सोनेरी रंगाचा साप दिसला तर समजा हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत.


5. हिरवा निसर्ग :


स्वप्नात जर तुम्हाला नैसर्गिक चित्र दिसलं तर हे शुभ मानलं जातं. हा हिरवागारपणा जर तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी दिसला तर हे आणखी शुभ मानलं जातं