नवी दिल्ली :  ग्रहणाचे सूतक मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजेपासून लागणार आहे. ग्रहण सुरु झाल्यानंतर मंदिरामध्ये पुजा आणि आरती होणार नाही. ज्योतिषानुसार ग्रहणाचा स्पर्श बुधवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी, मध्यकाल ७.२५ आणि मोक्ष ९.०८ मिनिटांनी होईल. सुर्योद्य सकाळी ६.४२ वाजता आणि सकाळी ६.४७ वाजेपर्यंत खग्रास स्वरुपात दिसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रानुसार कुंभ राशीच्या पंचग्रही योगामध्ये ग्रहण आले आहे. ३२० वर्षानंतर हा योग असल्याचे ज्योतिषांचे म्हणणे आहे. ज्योतिषांच्या मते कुंभ राशीमध्ये केतु, बुध, सूर्य, शुक्र आणि चंद्र राहतील.  सूर्यग्रहणामुळे १२ तास आधी सुरु होणाऱ्या सुतकामुळे आज सायंकाळी ६ वाजल्यापासून मंदिरातील कपाट बंद होतील. यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण संपल्यानंतर कपाट उघडले जातील. 


दरम्यान, हे ग्रहण भारतात केवळ काही वेळासाठीच दिसणार आहे. भारतात बुधवारी सकाळी ५.४३ मिनिटांनी ग्रहण लागेल. उत्तर पश्चिम आणि पश्चिम भाग सोडल्यास उर्वरित भारतात सकाळी ६.४७ मिनिटांपर्यंत राहील.