मुंबई : तुमचा हातही तुमच्या आयुष्याबद्दल भाष्य करू शकतो. तुमच्या हातावरच्या रेषा तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दलही काही सांगत असतात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा हात पाहा... आणि तपासा तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतायत तुमच्या जोडीदाराबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल... 


काय पाहावे हातामध्ये


- तुमच्या हातावरची 'मॅरेज लाईन' अर्थात वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य करणारी रेषा तुमच्या 'हार्ट लाईन'कडे वळणारी असेल तर तुमच्या जोडीदाराचा अकस्मात मृत्यू होण्याची शक्यता आहे.


- तुमचं नातं अतूट आणि दीर्घ काळ टीकणारं आहे असं एखादी लांबलचक 'मॅरेज लाईन' सांगते.


- 'मॅरेज लाईन' अनामिकेकडे (करंगळीजवळचे बोट) वळणारी असेल तर ही व्यक्ती दीर्घकाळ अविवाहीत राहते... मात्र, उतरत्या वयात या व्यक्ती विवाहबंधनात अडकू शकतात. 


- तुमच्या हातावरची हार्ट लाईन आणि चौथं बोट यांमधील अंतर फार कमी असेल तर याचा अर्थ तुम्ही उशीरा लग्न करणार असा होतो.