मुंबई : आजकाल अनेकांच्या हातात तुम्ही कासवाची अंगठी पाहिली असेल. काही लोक फॅशनसाठी घालतात तर काही वास्तुशास्त्रानुसार घालतात. मात्र ही अंगठी घालण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर घ्या जाणून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार ही अंगठी परिधान केल्यानंतर व्यापारात प्रगती, आत्मविश्वास आणि आरोग्य चांगले राहते. लक्ष्मीची कृपा कायम राहते. 


पौराणिक कथांनुसार, कासव भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो. कासव धैर्य, शांती, निरंतरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कासवाची अंगठी परिधान करताना एक गोष्ट जरुर ध्यानात ठेवावी. 


ती म्हणजे कासवाच्या डोक्याचा भाग परिधान करणाऱ्याच्या दिशेने असावा. यामुळे लक्ष्मीचे आगमन कायम राहते. तसेच ही अंगठी मधल्या वा पहिल्या बोटात परिधान करावी. असाही सल्ला दिला जातो.