रामभक्त हनुमान बह्मचारी नव्हते?
रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात.
नवी दिल्ली : रामभक्त पवनपुत्र हनुमान हे ब्रह्मचारी होते... त्यामुळेच, अनेक ठिकाणी विवाहित स्त्रियांना त्यांची पूजा करण्यापासून आणि मूर्तीला हात लावण्यापासून रोखलं जातं. परंतु, काही पुराणांमध्ये याच्या अगदी उलट गोष्टी पाहायला मिळतात.
हनुमानाची पत्नी
'पाराशर संहिता'मध्ये उल्लेख केल्यानुसार, हनुमानाचाही विवाह झाला होता. सूर्याची पुत्री सुवर्चला ही त्यांची पत्नी...
सूर्य देवांकडून विद्या शिकण्यासाठी विवाहित असणं आवश्यक होतं. यामुळे, शिक्षा म्हणून हनुमानानं सुवर्चला हिच्याशी विवाह केला होता, असं पराशर संहितेत म्हटलं गेलंय.
सुवर्चलेचं मंदिर
हनुमानाची विद्या शिकून झाल्यानंतर लगेचच सुवर्चला अंतरध्यान पावली त्यामुळे, हनुमानाला ब्रह्मचारी समजलं जातं. तेलंगनाच्या खम्मम जिल्ह्यात सुवर्चलेचं मंदिरदेखील पाहायला मिळतं.
हनुमानाचा पुत्र
इतकंच नाही तर हनुमानाला एक मुलगाही होता, असंही तेलंगनामध्ये सांगितलं जातं. परंतु, असा उल्लेख मात्र पराशर संहितेमध्ये नाही.