मुंबई :  एखाद्या स्त्रीचा होणारा नवरा कसा असेल याची माहिती ज्योतिषशास्त्रात मिळू शकते. कुंडलीतील सप्तम भाव विवाहासाठी महत्त्वाचा मानला जातो. कुंडली १२ लग्नांवर आधारित १२ प्रकारच्या असतात. कुंडलीतील सप्तमीच्या भाव काय आहे यावरुन त्या स्त्रीचा होणाऱ्या नवऱ्याचा स्वभाव कसा असेल घ्या जाणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष – जर एखाद्या मुलीच्या कुंडलीत सप्तम भाव मेष आहे तर तिचा होणारा नवऱ्याकडे चांगली संपत्ती असेल. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धी असेल.


वृषभ – ज्यांच्या कुंडलीत सप्तम भाव वृषभ आहे तिचा होणारा नवरा सुंदर आणि गुणवान असेल. गोड बोलणारा तसेच पत्नीचे ऐकणारा असा असेल.


मिथुन- जर कोणत्या मुलीच्या कुंडलीत सप्तम भाव मिथुन असल्यास तिचा होणारा नवरा सामान्य, समजदार आणि वैचारिक असेल. यांचा जीवनसाथी हुशार व्यवसायिक असेल.


कर्क – ज्यांच्या कुंडलीत सप्तम भाव कर्क राशीत आहे त्या मुलींचा होणारा पतीचे रंगरुप सुंदर असेल. कुटुंब तसेच समाजात त्याला मान-सन्मान मिळवेल.


सिंह - जर एखाद्या मुलीच्या कुंडलीत सप्तम भाव सिंह आहे अशा मुलींचा होणारा नवरा स्वत:चीच गोष्ट खरी करणारा असेल. मात्र ईमानदार असेल. यामुळे समाजात मानसन्मान मिळवेल.


कन्या - ज्यांच्या कुंडलीत सप्तम भाव कन्या आहे तिचा नवरा आर्कषक व्यक्तिमत्व तसेच गुणवान असतो. विवाहानंतर या मुलीचे जीवन अधिक चांगले होते.


तूळ - जर कोणत्या मुलीच्या कुंडलीत सप्तम भाव तूळ असल्यास या स्थानाचा स्वामी शुक्र असतो. हिचा पती शिक्षित तसेच सुंदर असेल. पत्नीची साथ देणारा असेल.


वृश्चिक - ज्यांच्या कुंडलीत सप्तम भाव वृश्चिक राशीत आहे. यांचा नवरा कठीण परिश्रम करणारा असतो. तसेच सुशिक्षितही असतो.


धनू - जर एखाद्या मुलीच्या कुंडलीत सप्तम भाव धनू आहे त्यांचा नवरा स्वाभिमानी असतो. यांचे जीवन सामान्य असते.


मकर - ज्यांच्या कुंडलीत सप्तम भाव मकर आहे अशा मुलींच्या होणाऱ्या नवऱ्याला धार्मिक कामातून आनंद मिळतो. दिव्य शक्तींवर यांचा अधिक विश्वास असतो.


कुंभ – कुंडलीत सप्तम भाव कुंभ राशि असल्यास त्यांचा होणार नवरा सभ्य तसेच आस्थावान असतो. यांचे वैवाहिक जीवन चांगले असेल.


मीन - जर कोणत्या मुलीच्या कुंडलीत सप्तम भाव मीन राशी असल्यास तिचा होणार नवरा गुणवान आणि धार्मिक असतो. यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. कार्यक्षेत्रात मोठे शिखर गाठतात. तसेच कुटुंबात मान मिळतो.