मुंबई : आठवड्यातील सात दिवसांचे कारक ग्रह वेगवेळे असतात. जसा रविवारचा कारक ग्रह सूर्य, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनि असतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तिंच्या जन्मवारावरुन त्यांच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - भाग्यशाली असतात. यांचे जीवनमान अधिक असते. कमी बोलतात. कलाकार असतात. मान-सन्मान अधिक मिळतो. धार्मिक कार्याची आवड असते. सगळ्यांना आनंदी ठेवतात.


सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - हसतमुख असतात. नेहमी गोड बोलतात. हुशार आणि बहादूर असतात. यांना कफाचा मात्र सतत सतावतो. सर्व सुखसोयी मिळतात. कलाकार असतात. मेहनती असतात.


मंगळवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - रागीट स्वभाव. सतत कोणाशी ना कोणाशी विवाद होत असतात. त्वचा रोगाचा संभव. साहसी आणि बदाहूर असतात. रचनात्मक असतात. तणावाखाली असतात. चांगले नेता बनू शकतात. 


बुधवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - धार्मिक कार्यात आनंद. बुद्धीने हुशार असतात. गोड बोलणाऱ्या असतात. मात्र त्याबरोबरच बेजबाबदारही असतात. प्रतिभावान व्यक्तिमत्व. 


गुरुवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - बुद्धिमान असतात. संकटांना न घाबरणारे. चांगले मित्र असतात. भाग्यवान असतात. काही गोष्टीत कट्टर असतात. नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. असाधारण व्यक्तिमत्व


शुक्रवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - चांगले वक्ता बनू शकतात. सहनशील असतात. संकटांचा निडरपणे सामना करतात. करिअरमध्ये सफल होतात. बुद्धिमान असतात. समाजात यांना मान सन्मान मिळतो. 


शनिवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती - कृषि,व्यापारात यांना लाभ मिळू शकतो. टेक्निकल कामांमध्ये आवड असते. मित्रांपासून सावध राहा. घरात सुख शांती नांदते. जोखीम पत्करण्यास घाबरतात.