मुंबई : नेहमी घराचं नूतनीकरण करायचं असेल तर घराचे दरवाजे किंवा घरातील काही खोल्यांमध्ये काही फरक करुन ते केले जाते. घराची पुनर्रचना केल्याने घरात संपत्ती येते, आनंद येतो अशी अनेकांची धारणा असते. मात्र घराची पुनर्रचना चुकली तर त्याचे वाईट परिणामही होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनात येणाऱ्या वाईट बदलांचे कारण अनेकांना समजत नाही आणि एकामागून एक येणाऱ्या संकटांचा सामना लोकांना करावा लागतो. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की जेव्हा घराचे रुपडे पालटते तेव्हा घरात अनेक गुण-दोष सुरू होतात. जर घराची पुनर्रचना केल्यावर घरात वाईट घटना घडत असतील तर घराचे पालटलेले हे रुप आपल्याला लाभत नसल्याचे समजावे. 


अशा दोषांपासून सुटका मिळवण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय दिले आहेत.


- घराच्या दारावर लाल पायांचे निशाण तयार करावे किंवा धातूंचे पायांचे निशाण लावावे. या पावलांना लक्ष्मीची पावले मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाहीत. 


- घराच्या मुख्य दारावरील भिंतीवर नृत्य करणाऱ्या गणेशाची प्रतिमा लावावी. यामुळे घरात आनंदी वातावरण राहण्यास मदत होते. 


- घराच्या उत्तर दिशेला लक्ष्मीचे छायाचित्र लावावे. यामुळे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव होतो. हे चित्र धनाचा वर्षाव करणाऱ्या लक्ष्मीचे असावे. यामुळे घरात धनप्रवाह अखंडित चालू राहतो.