मुंबई : रोजच्या स्पर्धात्मक जीवनाने जर तुम्ही कंटाळला असाल तर वास्तूशास्त्रामध्ये सांगितलेल्या या टीप्स फॉलो करा. यामुळे तुमच्यामध्ये नवी उर्जा संचार होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. घरातील कोणत्याही भींतीवर एका धावणाऱ्या घोड्याचा फोटो लावा. वास्तूशास्त्रानुसार घोडा हा उर्जा आणि शक्तीचं प्रतिक आहे. सफेड घोडा हा सकारात्मक ऊर्जा तयार करतो.


२. जर तुम्हाला पक्षांची आवड असेल तर घरातल्या कोणत्याही दक्षिण भागात पक्षांचा पिजंरा लटकवून ठेवा. यामुळे घरात निराशाचं वातावरण राहत नाही.


३. ऑफिसमध्ये काम करतांना अनेकदा कंटाळा येतो. त्यामुळे ऊर्जा कमी होते. त्यामुळे तुमच्या कंप्यूटरचा वॉलपेपर एका धावत्या घोड्याचा फोटो ठेवा. यामुळे तुमच्यात ऊर्जा निर्माण होईल. 


४. जर तुम्ही खूप निराश झाले असाल तर तुम्हाला मिळालेले अवार्ड, पारितोषिकं, सर्टिफिकीट, डिग्रीचं प्रमाणपत्र घराच्या दक्षिण भागातील भींतीवर लावा. 


५. घरात उत्साह कायम राखण्यासाठी तुमच्या बगीचामध्ये दक्षिण भागात लाल आणि पिवळ्या रंगाच्या फुलाचं झाड लावा. बगीचा नसेल तर शक्य तिथे तुम्ही या रंगाच्या फुलांची झाडं लावू शकता. 


६. घरात ऊर्जा आणि उत्साह संचार करण्यासाठी रंगीबीरंगी मेनबत्यांचा वापर करू शकता. मेनबत्यांचा प्रकाश शक्तिशाली ऊर्जेचा संचार करतात.