स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.......अंतिम प्रकरण ४
( अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
पुणे : ( अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लास्सेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या....
आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे.
कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.....
१. निकालामागचे गौडबंगाल.......याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी..
२. शिक्षक.....याच पेज वरची माझी 13 मे ची पोस्ट बघावी..
३. नोट्स....याच पेज वरची माझी 17 मे ची पोस्ट बघावी..
४. टेस्ट सिरीज आणि अभिप्राय (feedback) ....याच पेज वरची माझी 17 मे ची पोस्ट बघावी..
५. वेळापत्रक.....
चांगले शिक्षक, नोट्स आणि टेस्ट सिरीज बरोबर गरज आहे योग्य वेळापत्रकाची.
क्लास लावण्यापूर्वी त्या क्लास च्या मागील विद्यार्थ्यांकडून पुढील बाबींची शहानिशा करायला विसरू नका....
=संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो का?
=प्रत्येक विषयाला योग्य न्याय मिळतो का?
=एखादया विषयाचे अध्यापन चालू केल्यानंतर त्याचा अभ्यासक्रम संपेपर्यंत तोच विषय शिकवला जातो कि मधेच सोडून दिला जातो, पुन्हा काही काळानंतर शिकवला जातो? (हे योग्य नाही)
=लेक्चर वेळेवर होतात का?
=संपूर्ण बॅच किती तासांची आहे? इ. इ.
तुम्ही क्रॅश कोर्स, विकेंड बॅच, दीर्घ मुदतीच्या बॅचेस लावणार असाल तर वरील मुद्दे जास्त महत्त्वाचे ठरतील.
****क्लास लावण्यापूर्वी त्या क्लासच्या मागील वर्षीच्या त्याच बॅचचे वेळापत्रक नीट पार पडले का याची खात्री केल्याशिवाय पैसे भरू नका*****
६. फी....
फी किती आकारावी हा अर्थातच प्रत्येक क्लासचा अधिकार आहे... परंतु जी फी आकारली जाते त्याचे काहीतरी स्पष्टीकरण असले पाहिजे ... शिक्षक कोण आहेत?, किती तास शिकवले जाणार आहे?, नोट्स ची पाने किती आहेत?, टेस्ट किती आहेत?, अभिप्राय (feedback) साठी शिक्षक किती वेळ देणार आहेत? यावर फी ठरावी..
कर वेगेळे आकारले जातात का? नंतर काही पैसे भरावे लागतात का? फी परत (Refund) मिळण्याची काही सोय आहे का? हे आधीच विचारून घ्या.
*****फी मध्ये नक्की काय काय पुरवले जाते याची क्लास कडून यादीच घ्या.******
७. स्ट्रॅटेजी (strategy).....
वरील बाबीविषयी क्लास चे धोरण म्हणजेच क्लासची स्ट्रॅटेजी. प्रत्येक क्लास बरोबर ती बदलू शकते. ती समजावून घेऊन, ती तुम्हाला कितपत लागू पडेल याचा विचार करून क्लास लावण्याचा निर्णय घ्यावा.
८. ‘डेमो’ लेक्चर.......
तुमचा अजूनही तो क्लास लावण्याचा निर्णय निश्चित होत नसेल तर ‘डेमो’ लेक्चर ची मागणी करा. तो तुमचा हक्क आहे. त्यानंतरच फी भरा.
क्लास किती जुना आहे, त्याच्या शाखा किती आहेत, त्यांच्याकडे किती विद्यार्थी आहेत, त्याची जाहिरात किती आहे..... या पेक्षा पूर्वीच्या विद्यार्थ्यांचे त्या क्लास विषयी मत काय आहे हा प्रश्न महत्त्वाचा....
कालपरत्वे क्लास, संस्था किंवा संचालक यांच्या विशिष्ट इमेज तयार होतात. संस्था किंवा संचालक ‘प्रशासनात मराठी टक्का वाढवणे, सामाजिक क्रांती करणे, चळवळ करणे, NGO च्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे, युवकांचे व्यक्तिमत्व विकसन करणे’ अशी व्यापक ध्येये समोर ठेवतात. हे कार्य महत्त्वाचे आहे, परंतु स्पर्धा परीक्षेचा क्लास हे त्याचे माध्यम होऊच शकत नाही. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
तुम्ही क्लास लावत आहात, एखाद्या सामाजिक चळवळीत सहभागी होत नाही आहात, याचे भान ठेवा. या क्षणी तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अभ्यास करून पास होणे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे. ते होत असेल तरच दुसऱ्या गोष्टीला अर्थ आहे. म्हणून क्लास निवडण्याचा तुमचा निर्णय व्यावसायिक असावा... जेणे करून तुमच्या आयुष्यातील दोन वर्ष आणि तुमच्या पालकांचे पैसे वाया जाऊ नयेत...
आज स्पर्धा परीक्षा प्रचारकांची महाराष्ट्रात कमी नाही. माझी या सगळ्यांना विनंती आहे... नुसते MPSC आणि UPSC चे करिअर किती चांगले आहे, याचा प्रचार करण्याबरोबरच वरील मुद्देही विद्यार्थ्यापर्यंत पोहचवावेत.
माझी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष विनंती आहे... महाराष्ट्रातील विद्यार्थी कुठला क्लास लावतो यात त्यांची भूमिका अतिशय निर्णायक आहे, हे ते नाकारू शकत नाहीत. त्यांनी याचा अधिक गांभीर्याने विचार करावा.
*****विद्यार्थी आणि पालकांनो, या मुद्यांचा न कंटाळता पाठपुरावा करूनच तुम्ही निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला या चार पोस्ट पटल्या असतील तर अधिकाधिक जणांशी त्या शेअर कराव्यात******
अतुल लांडे ईमेल आयडी atul@upscmantra.com