मुंबई : (अतुल लांडे, पुणे) स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे.
माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लास्सेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या.


आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.


१. निकालामागचे गौडबंगाल.......याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी...


जर तुम्हाला पूर्व वा मुख्य परीक्षेसाठी क्लास लावायचा असेल तर त्या क्लासने दावा केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यानि तीच बॉच केली असेल असे नाही. तुम्हाला ज्या विषयासाठी क्लास लावायचा असेल त्या विषयाचा त्या क्लासचा निकाल कसा आहे हे पडताळून पाहणे गरजेचे आहे. 


२. शिक्षक.....याच पेज वरची माझी 13 मे ची पोस्ट बघावी..
क्लास लावण्यापूर्वी तुम्हाला जे शिक्षक प्रत्यक्ष शिकवणार आहेत त्यांना भेटा आणि तुमची खात्री करून घ्या.


३. नोट्स....
क्लासमध्ये सर्व विषयाच्या इत्थंभूत छापील नोट्स मिळणे आवश्यक आहे. केवळ नोट्समुळे कोणी पास होत नाही परंतु क्लासने नोट्स दिल्या तर तुमचा लिखाणाचा बराच वेळ वाचतो. संदर्भ पुस्तके वाचून क्लास नोट्स मध्ये नसलेली माहिती तुम्ही नोट्स मधेच अॅड करणे अपेक्षित आहे. सगळ्याच नोट्स तुम्हाला काढाव्या लागल्या तर त्यात खूप वेळ जातो.


कमी जास्त प्रमाणात सगळेच क्लास काहीतरी नोट्स देतातच. तुम्ही त्याच्या दर्जाची खात्री करून घेणे गरजेचे आहे. सगळ्याच विषयांच्या इत्थंभूत नोट्स मिळतात कि नाही हेही तपासणे गरजेचे आहे. नोट्स सुधारित (updated) असणे अपेक्षित आहे.
क्लास जर छापील नोट्स न देता लिहून देत असेल तर क्लासचा निम्मा वेळ लिहून देण्यातच जातो. अध्यापनाचा भर चर्चा आणि विश्लेषणावर असावा न कि लिखाणावर.


काही शिक्षक सांगतात, वर्गात लिहून दिले कि तो विषय एकदा हाताखालून जातो. यात कितीसे तथ्य आहे? परीक्षेत ज्या प्रकारचे लिखाण करावे लागते त्याप्रकारच्या लिखाणाच्या सरावासाठी स्वतंत्रपणे सराव चाचण्या असाव्यात.


काही क्लासेस तर चक्क दुसऱ्याच क्लास च्या नोट्स वापराव्यात असा सल्ला देतात. तुम्ही एखादा क्लास लावला तरीही इतर क्लासच्या नोट्स वापरायला काहीच हरकत नाही. पण तो निर्णय तुम्ही घ्याल. स्वतः क्लास नेच सांगणे, आपल्या नोट्स च नाहीत किंवा त्या चांगल्या नाहीत म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या नोट्स वापरा, हे कितपत योग्य आहे.


******क्लास लावण्यापूर्वी तुम्ही स्वतः नोट्स च्या दर्जाची खात्री करून घ्या. सर्वच विषयाच्या नोट्स मिळतात याची खात्री करा. मागील वर्षाच्या नोट्स पाहण्यासाठी मागून घ्या.******


४. टेस्ट सिरीज आणि अभिप्राय (feedback) ....
तुम्ही जर एखाद्या क्लासला विचारले ‘तुम्ही टेस्ट घेता का?’ उत्तर ‘हो’ असेच मिळणार आहे. नुसती टेस्ट सिरीज असून उपयोगाचे नाही, ती दर्जेदारच असली पाहिजे. परंतु त्यांचे नियोजन कसे असते? किती टेस्ट घेतल्या जातात? त्या वेळेवर होतात का? त्यांचा दर्जा कसा असतो? पेपर वेळेवर तपासून मिळतात का ? वैयक्तिक अभिप्राय मिळतो का ? याची शहानिशा करणे गरजेचे आहे.


लक्षात ठेवा हि स्पर्धा परीक्षा आहे, इतरांच्या तुलनेत तुम्ही नक्की कुठे आहात हे कळण्यासाठी एका चांगल्या टेस्ट सिरीजची गरज असतेच.


वैयक्तिक अभिप्राय मिळणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत , त्यातील समस्या वेगवेगळ्या असतात. शिक्षकांनी त्या वेळ काढून वैयक्तिकरित्या सोडविल्या पाहिजेत.
तुम्ही क्लास लावताना खरेतर टेस्ट सिरीज आणि अभिप्राय विषयी बाबींचा करार बॉंड पेपर वर करून घेतला पाहिजे.


क्लास ची निवड चुकली आहे हे कालांतराने जरी तुमच्या लक्षात आले तरी, तुम्ही टेस्ट सिरीज दुसरीकडे लावा. बरेच प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पर्याय आज उपलब्ध आहेत.


******माझा तुम्हाला सल्ला आहे.... क्लास लावा अगर लावू नका, चांगली टेस्ट सिरीज लावणे मात्र अनिवार्य आहे ******