मुंबई : क्रिकेटर श्रीसंत लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. आयपीएल फिक्सींगमध्ये नाव आल्यानंतर श्रीसंतच्या क्रिकेट करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पण आता श्रीसंत हा सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा टीव्हीवर दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा भट्टच्या आगामी चित्रपटात तो झळकणार आहे. रिचा चड्डाचा पावरफूल रोल असलेल्या कॅबरेट या सिनेमात तो तिच्यासोबत काम करतांना दिसणार आहे. 


हा चित्रपट हेलन यांच्या जीवनावर आधारित असल्याची देखील चर्चा होती. पण पूजा भट्ट हिने हे खोडून काढलं आहे. तिचं म्हणणे आहे की या सिनेमाची कथा सत्य आहे पण ती कोणावरही आधारित नाही.