मेडिकलच्या रखडलेल्या 400 जागांचे प्रवेश होणार, झी 24 तासचा दणका
बातमी झी 24 तासच्या दणक्याची. 9 खासगी महाविद्यालयांनी आपल्या जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवल्या. या महाविद्यालयांमुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. आता रखडलेल्या 400 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे.
मुंबई : बातमी झी 24 तासच्या दणक्याची. 9 खासगी महाविद्यालयांनी आपल्या जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवल्या. या महाविद्यालयांमुळे प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. आता रखडलेल्या 400 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे.
तर याव्यतिरिक्त दोन कॉलेजना सरकारने नोटीसा पाठवल्यात. फी अधिक असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाने या नोटीसा पाठवल्यात. तळेगाव आणि लातूरच्या एमआयएमईआर या दोन कॉलेजला नोटीस पाठवून फी कमी करण्याचे आदेश देण्यात आलेत.
दरम्यान, फी रेग्युलेशन अॅक्टमध्ये बदल करणार असल्याचं ट्विट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. त्यामुळे 9 खासगी कॉलेजेसनी आपल्या जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रखडलेल्या 400 जागांचे प्रवेश सुरू होणार आहेत.