मुंबई : पदवी परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई विद्यापीठ येत्या १० जूनला टीवायबीकॉम आणि टीवायबीएससीचे निकाल जाहीर करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर टीवायबीएच्या विद्यार्थ्यांना काही काळ अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांचे निकाल २० जूनला जाहीर होणार आहेत. 


विद्यापीठाने एप्रिल आणि मे २०१६मध्ये टीवायबीकॉम, बीएससी आणि बीएच्या परीक्षा घेतल्या होत्या. यावर्षी सात हजार ५०० विद्यार्थ्यांनी टीवायबीकॉमची परीक्षा दिली होती. तर १८ हजार विद्यार्थी बीए आणि बीएससी परीक्षेसाठी पात्र ठरले होते.