कॅलिफोर्निया : 'मूर्ती लहान पण किर्ती मोठी' अशी म्हण  प्रचलित आहे. तसाच प्रकार भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलाच्याबाबती झालाय. तनिष्क अब्राहन याने चक्क १२ व्या वर्षीच पदवी मिळविली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील महाविद्यालयातून पदवी प्राप्त करणाऱ्या तनिष्क अब्राहम या भारतीय वंशाच्या मुलाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कौतुक केलेय. अशी पदवी मिळविणारा तनिष्क हा अमेरिकेतील सगळ्यात कमी वयाचा विद्यार्थी ठरलाय. त्याचे पुढे स्वप्न आहे १८व्या वर्षी वैद्यकीय पदवी मिळवायची आहे.


तनिष्काच्या या यशाबद्दल दोन नामवंत विद्यापीठांनी स्वीकारले असून कोणत्या विद्यापीठातून मेडिकल डीग्री मिळवायची याचा निर्णय त्याने घेतलेला नाही. तनिष्क कॅलिफोर्नियातील सॅक्रामँटोचा रहिवासी आहे. त्याचे वडील बिजोऊ अब्राहम हे सॉफ्टवेअर इंजिनिअर तर आई जनावरांची डॉक्टर आहे.