मुंबई : सध्या राज्यासह देशात मराठी सिनेमाचा डंका गाजतोय. तो आहे 'सैराट'.  या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया आलेय. मला खूपच बर वाटतंय. आपली माणसं, मातीतील माणसं...आपली भाषा, या सिनेमाच्या माध्यमातून पुढे आलेय. ग्रामीण भागापासून ते शहरातील अबालवृद्धांपासून मिळणारा प्रतिसाद पाहून खूप समाधान देऊन जातोय. (व्हीडिओ पाहा बातमीच्या खाली)


११ दिवसात विक्रमी गल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पिस्तुल्या' , 'फँड्री' आणि आता 'सैराट' या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सूरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे. नागराच यांनी अस्सल ग्रामीण भागात सिनेमाचे शूटिंग केले. कोणताही बडेजावपणा न करता ग्रामीण भागातील कलाकारांची निवड केली आणि यश खेचून आणली. या सिनेमाने ११ दिवसात ४१ कोटींचे गल्ला जमवलाय.


मला वेळच नाही!


राज्यात १४ हजार शो सध्या सुरु आहेत. हे यश खूपच समाधान देणारे आहे. या सिनेमाने सर्वांनाच थिएटरकरडे खेचून आणले. आज मला अभिनंदनाचे फोन येत आहेत. एसएमएस येत आहेत. मला प्रत्येक मिनीट ४ -५ कॉल येत आहे. मला फोन घ्यायलाच वेळ मिळत नाही. मिळाणार प्रतिसाद पाहून याचे मला खूप समाधान असून आनंद आहे. त्या सर्वांचे धन्यवाद. आज मराठी भाषा, मराठी जगणं काय आहे, लोकांना यातून समजल आहे. आपण हिंदीला जास्त प्राधान्य देत येतोय, हे लक्षात येत नाही. मात्र, या सिनेमाने मराठीपण दाखवून दिले आहे. आपली माणसं, मातीतील माणसं. आपली भाषा काय आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न झालाय. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान आहे.



आपण रोज जगत असतो, पण त्या जगण्यातले बारकावे आपल्या लक्षात येत नाहीत हे बारकावे टीपण्याचं जे नागनाथ मुंजळे कौशल्य हा सिनेमा पाहताना दिसून येतात. संगीतकार अजय-अतुल, नागराज मंजुळे आणि रिंकू-आकाश यांची ही जोडगोळी या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.