मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताक पिण्याचे ५ मोठे फायदे :


१. आम्लपित्त : उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच एसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काली मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने एसिडिटी बरी होते.


२. रोग प्रतिकार शक्ती : ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते. 


३. कफ : कफची समस्या असेल तर ताकमध्ये ओवा टाकूण प्यावं. पोट साफ होण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लस्सीमध्ये पुदीना टाकूण प्यावे.


४. पचनक्रिया : ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या कधीच येत नाही. अधिक जेवन झाल्यास ताक पिल्याणे मोठा फायदा होतो. 


५. विटामिन : ताकमध्ये विटामिन सी, ए, ई, के आणि बी असतं. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होतं.