मुंबई : पपई हे फळ आरोग्यासाठी जितके चांगले तितकेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. तुमच्या त्वचेवर काळे डाग असतील तर ते घालवण्यासाठी इतर रासायनिक उत्पादनांचा वापर कऱण्यापेक्षा पपई जास्त गुणकारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पपईमध्ये व्हिटामिन एचे प्रमाण अधिक असते. त्यासोबतच पॅपेन एन्झाईमही असते. डेड स्कीन हटवण्याचे काम पपई करते. तसेच त्वचेतील ओलावा कायम राखते. स्कीन ग्लो कऱण्यासाठी पपई आणि मधाचा मास्क लावणे उत्तम.


चेहऱ्यावरील काळे डाग कमी कऱण्यासाठी पपईचा वापर फायदेशीर ठरतो. त्यासाठी पपईचा गर चेहऱ्यावर लावा. नियमितपणे २० मिनिटे असे केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. 


तळव्यांना भेगा पडल्या असतील तर पपईचा वापर फायदेशीर ठरतो. 


तुमचे केस गळत असतील आठवड्यातून तीन वेळा पपईचे सेवन फायदेशीर ठरते. 


नॅच्युरल कंडिशनर म्हणून पपईचा वापरही केला जातो. केस चमकदार बनवण्यासाठी पपईच्या गराचा वापर करतात.