मुंबई : कानात मळ जमणे ही तशी सामान्य गोष्ट पण कान वेळोवेळी साफ करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कान साफ न केल्यास खाज येणे, जळजळ किंवा इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. 


कान साफ करण्याचे ५ सोपे उपाय :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. कोमट पाणी : कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.


२. हायड्रोजन पॅरॉक्साइड : अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पराक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.
 
३. तेल : ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.


४ कांद्याचा रस : कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.


५. मिठाचे पाणी : गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा.