डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा
मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.
मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो. सध्या जगातील सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे डायबेटिस... जगात भारत हा डायबेटिसचा मोठा बळी आहे. भारतात डायबेटिसग्रस्त लोकांची संख्या नवनवे आकडे पार करतेय. डायबेटिस पूर्णपणे बरा करता येत नसला तरी काही प्रमाणात रोखला जाऊ शकतो. त्यापासून स्वतःचे रक्षण करता येते. त्यामुळे तुम्ही या विकाराचे बळी होऊ नये म्हणून काही काळजी घेणे आवश्यक आहे.
वजन घटवा
तुम्ही जर स्थूल असाल तर तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. जास्त वजन हे डायबेटिस होण्यासाठी पूरक असते. वजन घटवल्याने शरीरात तयार होणाऱ्या इन्शुलिनमध्ये वाढ होते आणि त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
नाश्ता करा
सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन तासांत नाश्ता करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. यामुळे डायबेटिसचा धोका कमी होण्यास मदत होते. नाश्ता करणे अजिबात टाळू नका.
तंतूमय (फायबर) पदार्थांचे सेवन करा
आहारात फळे, भाज्या, डाळी आणि टणक कवचाच्या फळांचा समावेश करा. तंतूमय पदार्थांचा आहारात समावेश असणे फार गरजेचे आहे. आहारातून शरीरात येणाऱ्या शर्करेचे प्रमाण कमी करण्यास हे पदार्त मदत करतात.
शारीरिक व्यायाम
नियमीत व्यायाम करणे तुमच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. व्यायामामुळे केवळ वजन कमी होते असे नाही, तर शरीरात उत्पन्न होणारे इन्शुलिन योग्य पद्धतीने वापरले जाते. त्यामुळे डायबेटिसचा धोका कमी होतो.
धूम्रपान टाळा
तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ते आत्ताच बंद करा. टाईप २ चा डायबेटिस धूम्रपानामुळे होण्यची मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्यामुळे या कारणाला बगल देणे गरजेचे आहे.