मुंबई : आज अनेकांना वजन कमी असल्याची समस्या आहे. अनेकांचं वजन हे कमी असल्यामुळे त्यांनी कसा आहार घ्यावा याबाबत अनेकांना प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे १० गोष्टी सांगणार आहोत ज्याचा आहारात समावेश केल्याने तुमच्या वजनात वाढ होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन वाढवण्यासाठी ७ पदार्थ :


१) दुध : दुधमधून प्रोटीन्स आणि कर्बोदके अधिक प्रमाणात असतात. ज्याचा उपयोग वजन वाढवण्यास मदत होते. १०० मिली दुधातून अंदाजे ३.४ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात आणि रोज २ ग्लास दुध प्यायल्यास तुम्ही १४ ग्रॅम प्रोटीन्स प्राप्त करु शकतात.


२) अंडी: अंड्याच्या सेवनाने देखील भरपूर प्रोटीन्स मिळतात. १०० ग्रॅम अंड्याच्या सेवनाने अंदाजे १३ ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. अंड्यातील‘व्हिटामिन ए’आणि ‘व्हिटामिन बी १२’चा आहारात समावेश फायदेशीर आहे.


३) केळी : वजन वाढवण्यासाठी अनेकांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. एका केळीतून १०५ कॅलरीज मिळतात ज्या तुम्हाला तात्काळ उर्जा देतात. व्यायामानंतर शरीराची झीज भरून काढण्यास मदत होते. बऱ्याचदा टेनिसपटू ब्रेकमध्ये उर्जा मिळवण्यासाठी केळी खातात.


४) बटाटा : जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश वाढवा. बटाट्यातील ‘ग्यूटामिन ‘ आणि ‘ अर्जिनीन ‘ यासारखी अमिनो अॅसिड वजन वाढवणाऱ्यांसाठी मदतगार आहेत. बटाट्याचा वापर सालीसकट केला तर ते जास्त फायदेशीर राहील.


५) सोयाबीन : वजन वाढवण्यासाठी सोयाबीनचा रोजच्या आहारात समावेश करू शकता. रोजच्या १०० ग्राम सोयाबीन सेवनाने तुम्हाला ३६ ग्राम प्रथिने मिळू शकतात. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास तुमच्या आहारात सोयाबीनचा समावेश करून घेऊ शकता.


६) लोणी : वजन वाढवण्यासाठी तुम्ही लोणीचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करून घेऊ शकता. लोण्यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात मेद मिळू शकतात. १०० ग्राम लोण्यातून तुम्हाला ८१ ग्राम मेद मिळू शकेल.


७) सुकामेवा : काजू, बदाम ,अक्रोड, किसमिस यासरख्या तात्काळ कॅलरीज देणारा सुकामेवा आहारात ठेवा. फळांपेक्षा सुकामेवा खाणे हा वजन वाढवण्याचा एक हेल्दी उपाय आहे. फळांपेक्षा सुक्यामेव्यातून शरीराला अधिक कॅलरीज आणि पोषणद्रव्ये मिळतात.