मुंबई : यौन संबंधात नको असलेल्या गर्भधारणेला रोखण्यासाठी अनेक जण कंडोमचा वापर करतात. कंडोमचा वापर सेफ सेक्स म्हणून केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंडोमचा वापर निश्चीत फायदेशीर असतो आणि यौन संचारित रोग तसेच नको असलेली गर्भधारणेपासून वाचण्यासाठी याचा उपयोग होतो. बहुतांशी लोकांना याची योग्य वापरची माहिती नसते. याचा अधिक वापरही अनेक तोटे निर्माण करू शकतो.


जवळपास ९४ टक्के पुरुष हे कंडोमचा चुकीचा वापर करतात असं कॅनडाच्या संशोधकांचं मत आहे.


कंडोम वापरतांना ५ गोष्टींची काळजी घ्या


१. कंडोमची आतली बाजू बाहेर झाल्याचे किंवा चुकीच्या पद्धतीने ते वापरले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करू नका.


२. कंडोमचा वापर करतांना तो पूर्णपणे घट्ट ठेवू नका. पुढची बाजू मोकळी ठेवा.


३. कंडोम घेण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करुन घ्या.


४. एकावेळी एकाच कंडोमचा वापर केला पाहिजे. काही जण २ कंडोमचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. पण यामुळे सुरक्षितता वाढते असं नाही.


५. कंडोम वापरतांना त्याचा पूर्ण वापर झाल्यास ते टाकून द्या. अधिक काळ कंडोम वापरल्यास त्यामुळे सुरक्षित राहण्याचं प्रमाण कमी होऊन जातं.