मुंबई : संडे असो वा मंडे रोज खा अंडे, अशी जाहिरात करण्यात येते. मात्र, अंडे आरोग्यसाठी एक खूप लाभदायक आहे. रोज एक अंडे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तुम्ही अंड्याचा वापर आहारात केल्यानंतर अंड्याचे कवच फेकून देता. आता हे कवच फेकून देऊ नका. कारण या अंड्याच्या कवचामध्ये लपलेय सुंदर त्वचेचे राज.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंड्याच्या कवचाचा वापर करुन तुम्ही त्वचेबाबत काही तक्रारी असतील तर त्या दूर करु शकाल. मात्र, अंड्याच्या कवच्याचा वापर करण्यापूर्वी संपूर्ण कोरडे झाली पाहिजे. अंडे फोडल्यानंतर उन्हात कवच सुखवले पाहिजे. त्यानंतर त्या कवचाची पावडर करा. ही पावडर दुसऱ्या पोषक तत्वातही मिसळू शकता आणि त्यानंतर त्याचा वापर करु शकता.


तुमच्या त्वचेवर डाग किंवा रफ झाली असेल तर त्यावर अंडा कवच पावडरचा लेप करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करा आणि या पेस्टने चेहरा, हात यांचा हलका मसाज करा. काही दिवसाच त्वचा उजळलेली दिसेल.


कसा वापर कराल?


1. अंडे कवच याची पावडर करा. त्यात लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिसळा. त्याची पेस्ट तयार करा आणि त्वचेला लावा. डाग किंवा त्वचा इंफेक्शन दूर होण्यास मदत होते.


२. अंड्याच्या टरफलमध्ये (कवच) दोन चमचे मध मिसळा. किंवा पावडर आणि मध यांची पेस्ट करा आणि चेहऱ्याला लावा. चेहरा उजळेल. एका आठवड्यात त्वचा तजेलदार आणि उजळलेली दिसून येईल.


३. अंडी टरफलची पावडर केल्यानंतर त्यात बारीक पावडर असलेली साखर मिसळा. त्यानंतर अंड्याच्या पांढऱ्या पदार्थात फेटा. एक आठवडा चेहऱ्याला लावा, तुम्हाला फरक दिसून येईल.


४. आपण ब्रश दररोज करत असाल. मात्र, तुमचे दात पिवळे दिसत असतील तर अंडी टरफलची पावडर दातांना लावा किंवा दररोज मसाज करा. दात नैसर्गिकरित्या पांढरे होतील.


५. अंडी टरफल पावडरमध्ये कोरफड जेल मिसळा. ही पेस्ट त्वचेला लावा. तुमच्या चेहऱ्याची त्वजा उळण्यास मदत होते.