दुधीच्या रसाचे फायदे
दुधीचा रस शरीरासाठी पौष्टिक आहे. रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थं बाहेर पडण्यास मदत होते.
मुंबई: दुधीचा रस शरीरासाठी पौष्टिक आहे. रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने शरीरातील टाकाऊ पदार्थं बाहेर पडण्यास मदत होते.
दुधीत असलेल्या फायबरमुळे लवकर भूक लागत नाही. या रसात कॅलरी आणि फॅट कमी असतो, म्हणून वजन कमी करणाऱ्यांसाठी हा रस फायदेशीर आहे.
केसांची गळती थांबवण्यासाठी हा रस थोडासा तेलात मिसळून केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस वाढण्यास मदत होते.