मुंबई : कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात जीवनसत्व 'अ', 'ई' आणि 'क' असते. ही जीवनसत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसं यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मूत्रसंबंधी समस्यांचेही कच्ची पपई निराकरण करू शकते. 


शरीरावर अनेक नको असलेले केस उगवतात. हे अनावश्यक केस खराब दिसतात. दरवेळी वॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय होतो. कच्च्या पपईत असणारे पैपिन नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.