उन्हाळ्यात संत्री-मोसंबी खाण्याचे सहा फायदे
प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
मुंबई : प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जीव नकोसा होत आहे ना... मग, आपली पावले सहजच गारव्याकडे वळतात. मात्र, थंड पदार्थांमुळे आजारी पडण्याचा धोका असतो. म्हणून उन्हाळ्यात एकतरी रससशीत मोसंब खा आणि निरोगी रहा कारण संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे.
- मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे.
- मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.
- मोसंबीच्या सालीतून सुगंधी तेल प्राप्त होते.
- सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी, अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात.
- मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो.
- मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.