मुंबई: आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचे बरेच फायदे सांगितले आहेत. तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे निरोगी व्हायला मदत होते. याचे नेमके फायदे काय आहेत पाहूयात


1) कॅन्सरचा धोका कमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांब्याच्या भांड्यात अँटी-ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. 


2) थायरॉईड धोका कमी


तांब्यामधील थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवतं, त्यामुळे थायरॉईडचा धोका कमी होतो. 


3) हृदयविकारापासून राहा दूर


तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्यानं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणामध्ये राहतं, त्यामुळे हृदयविकाराच्या धोक्याचं प्रमाण कमी होतं. 


4) शरिरातलं रक्त वाढण्यास मदत


तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्यामुळे शरिरातल्या रक्ताचं प्रमाण वाढतं. 


5) अॅसिडीटी-पोटदुखीपासून मुक्ती


तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे अॅसिडीटी-पोटदुखीची समस्या दूर होते. 


6) सांधेदुखीपासून मुक्ती


रोज तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. 


7) त्वचेच्या समस्या होतात दूर


तांब्याच्या भांड्यातील पाणी रोज प्यायल्यामुळे डेड स्कीन निघून जाते आणि चेहरा उजळ दिसतो. 


8) जखम लवकर होते बरी


तांब्यातल्या अँटी-बॅक्टेरियल गुण असतात, त्यामुळे या भांड्यातून पाणी प्यायलामुळे तुमची जखम लवकर बरी व्हायला मदत होते.