मुंबई: पिकलेल्या केळ्यांचे अनेक फायदे सगळ्यांना माहिती आहेत. पण कच्चा केळ्यांच्या फायद्याविषयी मात्र अनेकांना कल्पनाही नसेल. कच्चा केळ्यांचा वापर हा भाजी आणि कोफ्ता बनवण्यासाठी केला जातो, पण कच्ची केळी खाल्ल्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. 
कच्चा केळ्यांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असतं, ज्यामुळे पाचन क्षमता चांगली होते. तसंच दिवसभर थकवा जाणवत नाही. कच्चा केळ्यांमध्ये असलेल्या विटॅमिन बी 6, विटॅमिन सी पेशींना पोषण देतात. 


वजन कमी करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन कमी करण्यासाठी रोज एक कच्च केळं खायचा सल्ला डॉक्टर देतात. केळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे शरीरातील अनावश्यक फॅट सेल्स काढून टाकायला मदत होते. 


बद्धकोष्ठतेच्या समस्येवर उपाय


कच्चा केळ्यामध्ये असलेल्या फायबर आणि स्टार्चमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 


भूकेवर ताबा मिळवण्यासाठी


कच्चा केळ्यांमध्ये असलेल्या फायबर आणि इतर पोषण गुणांमुळे भुकेवर ताबा मिळवता येतो. कच्ची केळी खाल्ल्यामुळे वारंवार लागणारी भूक नियंत्रणात येते, त्यामुळे जंक फूड खाण्यापासून वाचता येऊ शकतं. 


डायबिटीसवर नियंत्रण


जर तुमचा डायबिटीस प्राथमिक स्टेजमध्ये असेल तर कच्ची केळी खायला सुरुवात करा. कच्चा केळ्यामुळे डायबिटीस नियंत्रणात यायला मदत होते. 


पचन प्रक्रिया होते चांगली


कच्ची केळी खाल्ल्यामुळे पचन प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. याबरोबरच कच्चा केळ्यामुळे कॅन्सरचा धोकाही कमी होतो. यामध्ये असलेल्या कॅल्शिअममुळे हाडं मजबूत होतात.