मुंबई : होळीत केमिकल्सचे रंग वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा आणि केस यांची हानी होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दही आणि मध
दह्यात थोडं मध मिसळा, याचा हलकासा हात स्किनला लावा, रंग सहज निघण्यास मदत होईल.


दूध आणि खोबरेल तेल
दोन चमचा कच्चे दुध आणि एक चमचा खोबरेल तेल तसेच चिमुटभर हळद एकत्र मिसळा. हे मिश्रण थोडंस चेहऱ्यावर लावा, आणि चेहरा धुवून घ्या, रंग सहज निघून जाईल.


मुल्तानी माती
मुल्तानी माती, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिसळा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, नंतर १५ मिनिटांनी धुवा, रंग निघून जाईल.


सफरचंद आणि संत्री
सफरचंद उकळून घ्या, यात थोडासा संत्रीचा रस मिसळा, थंड करा आणि त्वचेवर हे मिश्रण लावा, रंग धुतल्यावर लगेच निघतली.


पपईचा गर
सरळ पपईचा गर चेहऱ्याला लावा, रंग निघून जातील, आणि त्वचा निघून जाईल.


अॅप्पल व्हिनेगर
रंगातील केमिकल्समुळे अनेक वेळा खाज सुटते, यासाठी एक कप पाण्यात २ चमचे व्हिनेगर टाका. त्वचेला लावा आराम मिळेल.


खोबरेल तेल
रंग खेळण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावा, यामुळे रंग सहज निघतील आणि केसाना इजा होणारा नाही.