जीभेचा रंग सांगतो तुम्हाला काय त्रास आहे
अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचाक केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
मुंबई : अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचाक केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.
जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ.
१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.
२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.
३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.
४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.
५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.
७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.
८. जीभेवर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.