मुंबई : अनेक पदार्थांमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर होतोय. यामुळे पदार्थाला वेगळीच चव येते. तसेच तूप आरोग्यासाठीही चांगले यामुळे विविध पदार्थांमध्ये तसेच गोडाच्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का केसांच्या आरोग्यासाठीही तूप गुणकारी आहे. घरगुती तुपाने केसांना मसाज केल्यास केसांची वाढ लवकर होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुपाचे हे आहेत फायदे
१. तुमच्या केसांत कोंडा झाल्यास केसांच्या मुळाशी तूप आणि बदाम तेलाचे मिश्रण करुन चोळा. यामुळे कोड्यांची समस्या लवकर संपेल. तसेच केसांची त्वचा कोरडीही राहणार नाही.


२.  केसांना योग्य पोषण मिळाले नाही की फाटे फुटण्याची समस्या निर्माण होते. यासाठी तूप फायदेशीर आहे.


३. लांब केस हवे असतील तर केसांना तुपाने मसाज करा आणि त्यात आवळा अथवा कांद्याचा रस मिसळून लावा. १५ दिवसांतून एकदा हे केल्यास केस लांब आणि घनदाट बनतात. 


४. केसांना मुलायम बनवायचे असल्यास तुप आणि ऑलिव्ह ऑईल एकत्रित करुन केसांना लावा. यामुळे नक्कीच फायदा होईल. 


५. केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी तुप कोमट करुन घ्या आणि २० मिनिटे केसांना मसाज करा. यात लिंबूचा रस लावा. १० मिनिटांनी केस धुवा.