पुन्हा गरम करुन हे ५ पदार्थ कधीच खाऊ नका
अनेकदा जेवन झाल्यानंतर बरंच जेवन वाचतं. मग ते वाया जावू नये म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि पुन्हा गरम करून खातो. पण काही पदार्थ असे आहेत जे पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
मुंबई : अनेकदा जेवन झाल्यानंतर बरंच जेवन वाचतं. मग ते वाया जावू नये म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि पुन्हा गरम करून खातो. पण काही पदार्थ असे आहेत जे पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
१, चिकन : चिकन पुन्हा गरम करून खाणे हानिकारक ठरू शकते. चिकन पुन्हा गरम केल्याने त्यामधील प्रोटीन कॉम्पोजिशन बदलतं. त्यामुळे पचन संबंधीत समस्या उद्भवू शकतात.
२. बटाटा : बटाट्याचे पदार्थ बनवून झाल्यानंतर काही वेळाने त्यातील पोषकतत्व निघून जातात. याला पुन्हा गरम करून खाल्यानंतर त्याचा शरिरावर नकारात्मक परिणाम होतो.
३. मशरूम : मशरूम हे नेहमी फ्रेश असतांनाच खालं पाहिजे. यामध्ये प्रोटीन असतात पण गरम केल्यानंतर या प्रोटोन्सचा कॉम्पोजिश्नमध्ये रुपांतर होतं आणि त्याच्या शरिरावर नकारात्मक परिणाम होतो.
४. अंड : अंड देखील पुन्हा गरम करुन खाल्याने नुकसानकारण ठरू शकतं. अंड्यामधील प्रोटीन पुन्हा गरम केल्याने त्याचं विषात रुपांतर होतं.
५. पालक : पालक पुन्हा गरम करुन खाणे हे कॅन्सरला आमंत्रण असू शकतं. पालक पुन्हा गरम करुन खाल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे गरम करुन पुन्हा हे पदार्थ खाणे शरिरासाठी हानिकारक ठरु शकतं.