सावधान ! ५ गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका
चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टी खातो पण त्या संबंधीत महत्त्वाचे असलेले नियम आपण विसरून जातो. काही पदार्थ रिकाम्या पोटी खाणे अतिशय घातक ठरु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ५ गोष्टी.
मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टी खातो पण त्या संबंधीत महत्त्वाचे असलेले नियम आपण विसरून जातो. काही पदार्थ रिकाम्या पोटी खाणे अतिशय घातक ठरु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ५ गोष्टी.
५ गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका
१. सोडा : सोडामध्ये कर्बोनेट अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. जर तुम्ही सोडा रिकाम्या पोटी घेतला तर तुम्हाला उलटी येऊ शकते किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं.
२. मसाल्याचे पदार्थ : कधीही रिकाम्या पोटी कोणतेही चटपटे आणि मसाल्याचे पदार्थ खाऊ नका. यामुळे नॅचरल अॅसिड असतं जे तुमचं पोट बिघडवू शकतं. यामुळे अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
३. चहा, कॉफी : कॉफी आणि चहा रिकाम्या पोटी घेणं घातक ठरु शकतं. रिकाम्या पोटी कॉफी घेतल्याने यामध्ये असलेलं कॅफिन तुमचं पोट बिघडवू शकतं. चहा प्यायल्य़ाने पोट दुखी होऊ शकते. त्याआधी एक ग्लास पाणी प्या.
४. टोमॅटो : टमाटरमध्ये अॅसिड अधिक असतं. रिकाम्या पोटी टमाटर खाल्याने पोटात रासायनिक क्रिया होऊ शकते ज्यामुळे पोटात जळजळ होऊ शकतं. यामुळे पोटात स्टोन होण्याचं प्रमाण वाढतं.
५ औषधं : डॉक्टर हा नेहमी रिकाम्या पोटी औषध न घेण्याचा सल्ला देतो. रिकाम्या पोटी औषधं घेतल्याने पोट बिघडू शकतं आणि शरिर असंतूलित होतं. यामुळे रिकाम्या पोटी औषधं कधीच घेऊ नका.