पोट साफ नाहीय... मग, प्या या चार फळांचा रस!
बहुतेकदा खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. पोट साफ न झाल्यानं अनेक लोक अस्वस्थ असलेले जाणवतात. अशा लोकांचं कामातही मन लागत नाही.
नवी दिल्ली : बहुतेकदा खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. पोट साफ न झाल्यानं अनेक लोक अस्वस्थ असलेले जाणवतात. अशा लोकांचं कामातही मन लागत नाही.
हा त्रास दूर करायचा असेल तर खाण्यापिण्याची काही पथ्यं तर तुम्हाला पाळावीच लागतील. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करायचा असेल तर या पाच फळांचा रस खूपच फायदेशीर ठरतो.
सफरचंदाचा रस
तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर नियमित रुपात सफरचंदाचा रस पिणं फायदेशीर ठरेल. सफरचंदात मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. फायबर तत्व बद्धकोष्ठतेचा त्रास फटाफट दूर करतात.
नासपतीचा रस
नासपतीतही फायबर तत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. हा रस तुमची पचनशक्ती वाढविण्यात तुम्हाला मदत करतो.
मोसंबी रस
बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी सहज उपलब्ध असलेला मोसंबी रसाचीही गोडी तुम्ही चाखू शकता. हा रस नियमितपणे घेतल्यास तुमच्या तक्रारी कधी दूर होतील, हे तुम्हाला कळणारदेखील नाही. मोसंबीतही फायबरचं प्रमाण मोठं असतं.
अननसाचा रस
अननस हे फायबरचं उत्कृष्ठ स्त्रोत आहे. बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून तुम्ही अननसाचा रस घेऊन शकता... अननसाचा रस आवडत नसेल तर फळच खाऊन टाका...