मुंबई : पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पित्त आणि अॅसिडीटीची मागे अनेक कारण असतात. मात्र पित्त उसळले की पोटातील जळजळ, छातीतील जळजळ, क्वचित कधी उलटी यांनी माणूस हैराण होऊन जातो. 


रात्रीची जागरणे, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या आणि वेदनाशामक गोळ्यांचे सेवन ही पित्त वाढण्याची मुख्य कारणे सांगितली जातात. 


अॅसिडीटी आणि पित्तावर घरगुती उपाय


अॅसिडीटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने अॅसिडीटी कमी होते. 
खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही अॅसिडीटीतून आराम मिळतो.
नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्‍या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते. 
नियमित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. 
तसेच मुळ्यावर लिंबू आणि  काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.
मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो. 
पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात.