लंडन : तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच संशोधनातून समोर आल्यानुसार, चॉकलेटचा एक तुकडा मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकतो. या शोधादरम्यान १८ ते ६९ वयांच्या दरम्यान असलेल्या ११५३ लोकांचा अभ्यास करण्यात आलाय. 


ज्या लोकांनी दररोज १०० ग्रॅम चॉकलेट खाल्लं त्यांच्या इन्सुलिन प्रतिकारची कमतरता आणि लीव्हर इन्जायममध्ये सुधारणा दिसली. यामुळे, हृदयरोगाचा धोका कमी होतो.


हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित करण्यात आलंय. कोकोआपासून बनवल्या गेलेल्या उत्पादनांपासून कार्डिक मेटाबॉलिक स्वास्थ्यात सुधारणा होत असल्याचं यात म्हटलं गेलंय.