मुंबई : केस पांढरे होऊ नयेत म्हणून आहारात पुढील गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. या गोष्टींचा आहारात नियमित समावेश केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो.


हिरवा भाजीपाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहारात नेहमी हिरव्या भाजीपाल्याचा समावेश करा, आहारात विटामीन बी ६ चा समावेश झाल्यास केस पांढरे होत नाहीत, विटामीन बी १२ रक्ताच्या पेशी निर्माण करतं, यामुळे शरीरातून डोक्यापर्यंत ऑक्सिजन जातो. 


चॉकलेट


मेलनिनमुळे केसांना रंग प्राप्त होतो, आणि मेलेनिन शरीरात कॉपरच्या प्रमाणावर तयार होते, जर शरीरात कॉपर नसेल, तर केसांचा रंग पांढरा होतो. आहारात कॉपर युक्त पदार्थांचा समावेश करा, यासाठी चॉकलेट, मशरूम आणि दाळ खा.


कढी पत्ता


कढी पत्ता देखील केस अवेळी सफेद होण्यापासून बचाव करत असतो. तो केसांची मूळ मजबूत करतो, कडी पत्ते आहारात वापरणेही चांगले आहे, त्याशिवाय नारळाच्या तेलात उकळून ते तेल लावल्यास केसांची मूळ मजबूत होतात.


रावस मासा


रावस मासा खाल्ल्याने पांढरे केस होत नाहीत, कारण रावस माशात सेलेनियम असतं, सेलेनियम हार्मोन्सचं संतुलन राखण्यास लाभदायी आहे, म्हणून आठवड्यातून एकदा आहारात रावसचा समावेश करा.


स्ट्रॉबेरी


स्ट्रॉबेरीत विटामिन सी असतं, ते  कोलेजन तयार करतं. कोलेजन वाढत्या वयात केस पांढरे होण्यापासून वाचवतं. केस पांढरे होणे वाचण्यासाठी विटामिन युक्त आहार घ्या.


अक्रोड आणि बदाम


बदामात मोठ्या प्रमाणात विटामीन-ई असतं, सकाळच्या नाश्तात बादाम खा, केस पांढरे होण्यापासून बचाव होऊ शकतो.


दुग्धजन्य पदार्थ


डेअरी उत्पादनांमध्ये विटामीन बी मोठ्या प्रमाणात असतं, विटामीन बी ६ आणि बी १२ लाल रक्त पेशींमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतं.
यामुळे स्काल्पमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचं प्रमाण वाढतं, मात्र फॉलिक अॅसिड आणि बॉयोटीन कमी असल्याने केसांचा रंग सफेद होतो.


आवळा 


आवळ्यात मोठ्या प्रमाणात केसांसाठी टॉनिक असतं, अवेळी पांढरे केस होत असतील तर आवळा रामबाण उपाय आहे. रोज एक आवळा खाल्ला तर आवळा सर्व शरीराचं आरोग्य व्यवस्थित ठेवतो.


सूर्यफूल


सूर्यफुलाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल असतं, जे शरीराला योग्य प्रकारे काम करण्यास मदत करतं. मिनरल मेलनिन तयार करण्यात आणि त्याची पातळी नियंत्रित करण्यात योग्य भूमिका पार पाडतं, जर तुमच्या शरीरात ही मिनरल्स कमी होत असतील, तर केस सफेद होऊ शकतात.


मीठ


आयोडीन युक्त मिठाचा आहारात समावेश करा. मीठाचा समावेश केळी, गाजर, मासे सारख्या पौष्टीक गोष्टीतून करा, तुम्हाला नक्की फायदा होईल, मात्र आहारात मीठाचं प्रमाण मर्यादेत ठेवा.