अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी वापरा या ९ टिप्स
सध्याच्या धावपळीच्या युगात घरचे जेवण सोडून फास्टफूड खाण्याकडे अधिकांचा कल असतो. यामुळे अॅसिडीटीची समस्या वाढते.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या युगात घरचे जेवण सोडून फास्टफूड खाण्याकडे अधिकांचा कल असतो. यामुळे अॅसिडीटीची समस्या वाढते. सुरुवातीला केवळ वृद्धांना याचा त्रास होत असे मात्र आता लहान मुलांमध्येही ही समस्या जाणवायला लागलीये. जर तुम्ही अॅसिडीटीने त्रस्त आहात तर खालील टिप्स वापरा.
१. अॅसिडीटीचा त्रास असेल तर जेवणानंतर सकाळ-संध्याकाळ आवळ्याचे चूर्ण घ्यावे.
२. आल्याच्या सेवनाने अॅसिडीटीपासून सुटका मिळते. यासाठी आल्याचे बारीक तुकडे गरम पाण्यात उकळून घ्या आणि थंड झाल्यावर हे पाणी नियमित प्यावे.
३. मुलेठीचे चूर्णही अॅसिडीटीपासून सुटका करते.
४. कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण पाण्यासोबत घेतल्यास अॅसिडीटीचा त्रास होत नाही.
५. मनुका आणि गुलकंदच्या नियमित सेवनानेही अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.
६. त्रिफला चूर्ण अॅसिडीटीवर उत्तम गुणकारी आहे. पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
७. पोटात जळजळ आणि अॅसिडीटी कमी करण्यासाठी हरडाचा वापर करा. तसेच लहसूणही यावर रामबाण उपाय आहे.
८. पोटदुखाची त्रास अथवा जळजळ होत असेल मेथीच्या पानांच्या वापराने लाभ मिळतो.
९. तुळशीची पाने चावून खाल्ल्याने अॅसिडीटीचा त्रास कमी होतो.