मुंबई : तुम्ही जेवणात भात घेत असाल तर तसेच भाताचे शौकीन असाल तर हे जरुर वाचले पाहिजे. आपल्या शरीरावर भाताचा काय परिणाम होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या देशात प्रत्येक राज्यात भात खाण्याला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. भात हा आपल्या आहारातील प्रमुख हिस्सा आहे.  भात घेतला नाही तर जेवण अपूरे वाटते, ही आपली कल्पना आहे. भाताचा प्रभाव आपल्या शरीरावर काय होतो, हे तुम्हाला माहीत आहे का?


भातात (तांदूळ) व्हिटॅमिन डी, लोह, फायबर, कॅल्शिअम, थायमीन आणि रायबोफ्लेविन यांची चांगली मात्रा असते. भाताला पौष्टिक खाद्य म्हणून संबोधले जाते. त्यामुळे लहान मुलांना आणि आजारी व्यक्तींना भाताची खिचडी, पेज खाण्याचा सल्ला दिला जातो.


तुम्हाला मधुमेह (डायबेटीस) आजार आहे. तर जास्त प्रमाणात भात खाणे योग्य नाही. त्यामुळे तुम्ही ब्राऊन भात खाण्यावर भर द्या. अस्थमा ज्यांना आजार आहे. त्यांनी भात खाऊ नये. त्यांच्यासाठी ते चांगले नसते.


भात खाण्यामुळे आपल्या शरीराला नाही तर आपल्या डोक्याला चांगली एनर्जी मिळते. एक वाटगा भात खाल्यामुळे शरीराचे मॅटाबॉलिज्म वाढते. त्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि ब्लड प्रेशरही नियंत्रित राहण्यास मदत होते. भातामुळे डोक्याला कार्बोहायड्रेट्स पण मिळते. त्यामुळे ते चांगले काम करते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी एक वाटगा भात खाणे जरुरीचे आहे. भातात सोडिअमची मात्रा असत नाही. त्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.


अल्जायमर आजार असणाऱ्यांसाठी भात चांगला असतो. दररोज भात खाल्यामुळे मेंदूत न्यूरोट्रान्समीटरचा विकास पटकन होतो. त्यामुळे अल्जायमर असणाऱ्यांना या आजारातून सुटका होण्यास मदत होते.


पांढरा भाता ऐवजी ब्राऊन भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराला या भातातून अघुलनशील फायबर मिळतो. कॅन्सर सारख्या आजारापासून आपल्याला सुरक्षा मिळते. आयुर्वेदात त्वचा सुंदर करण्यासाठी भात महत्वाची भूमिका बजावतो. तांदळाची पेजही त्वचा सुंदर करण्यासाठी मदत करते. अॅंटीऑक्सीडेंटमुळे शरीराला लाभ मिळतो. जास्त तापमानात भात खाण्यामुळे शरीराला गारवा मिळतो.