मुंबई : आजकालच्या धावत्या जीवनशैलीचा सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या वजनावर. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणे, व्यायाम करणे यासारखे उपाय केले तरी वजन काही कमी होत नाही. काहीजण तर यासाठी डाएट प्लानही बनवतात मात्र तो प्लान जास्त दिवस फॉलो केला जात नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तुम्हाला माहीत आहे का तुम्ही केवळ अंडी खाऊन तुमचे वजन कमी करु शकता. तुमच्या डाएटमध्ये अंड्याचा समावेश करुन तुम्ही १५ दिवसांत वजन कमी करु शकता. 


अंडे खाल्ल्याने पचनक्रिया तसेच फॅट विरघळण्याची प्रक्रिया वेगाने सुरु होते. तसेच इतर काही जंकफूड खाण्याची इच्छाही कमी होते.


खाली दिलेल्या सात दिवसांच्या डाएट प्लानमध्ये अंड्याचा समावेश करा. मात्र त्याचबरोबर पाणी पिण्याचे प्रमाणही योग्य असायला हवे


पहिला दिवस - नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी. लंचमध्ये ब्राऊन ब्रेडच्या दोन स्लाईस आणि डिनरमध्ये दोन अंड्यांसोबत सलाड
दुसरा दिवस - नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी. दुपारच्या जेवणात ब्राऊन ब्रेडसह टोमॅटो आणि लो फॅट चीजचा एक स्लाईस. डिनरमध्ये दोन अंड्यांसोबत सलाड.
तिसरा दिवस - नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी. लंचमध्ये एक अंडे आणि सलाड खा. डिनरमध्ये दोन उकडलेली अंडी, सलाड आणि एक ग्लास ज्यूस.
चौथा दिवस- नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी. दुपारच्या जेवणात उकडलेल्या भाज्या आणि दोन अंडी. डिनरमध्ये मासे आणि सलाड.
पाचवा दिवस - नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी. रात्रीच्या जेवणात सलाड आणि अंडी.
सहावा दिवस - नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी. लंचमध्ये टोमॅटो, सलाड, ग्रीन ज्यूस आणि चिकन.
सातवा दिवस - नाश्त्यामध्ये एक फळ आणि दोन उकडलेली अंडी.दुपारच्या जेवणात फळे घ्या. रात्रीच्या जेवणात उकडलेले अंडे, चिकन आणि संत्र्याचा ज्यूस.