मुंबई : जसजसे वय वाढत जाते तशा वाढलेल्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे वाढलेले प्रमाण वाढलेल्या वयाच्या खुणा दर्शवितात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उत्पादने आहेत मात्र यामुळे चेहऱ्यावर साईडइफेक्ट होण्याची शक्यता अधिक असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या फेसपॅकचा वापर करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंड आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक


अंड्यातील बलक वेगळे काढून उरलेला भाग फेटा. त्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि पुन्हा मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा आणि त्यानंतर चेहरा धुवा


काकडीचा फेसपॅक
काकडी किसून घ्या. त्यात एक अंड्याचा पाढरा भाग आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे मिश्रण चेहऱ्याला लावून १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवून टाका. 


पपई आणि मधाचा फेसपॅक
पपईची पेस्ट करा आणि त्यात मध मिसळून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. २० मिनिटे ठेवून नंतर चेहरा धुवा.


सफरचंदाचा फेसपॅक
सफरचंद पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढून कुस्करा. या पेस्टमध्ये मध आणि दुधाची पावडर मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.


मध आणि लिंबाचा फेसपॅक
एक चमचा मधात एक चमचा लिंबू रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून २० मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.