मुंबई : आजच्या जाहिरातीच्या युगात सारेच टुथपेस्ट ब्रॅन्ड चमकदार दातांचा दावा करतात. डेन्टिस्टकडे चमकदार दातांसाठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध असतात. पण अनेक घरगुती उपायांनीही तुम्ही तुमचे दात चमकदार बनवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारळाचे तेल ऑरगॅनिक आणि नॅच्युरल टीथ व्हाईटनर आहे. नारळाच्या तेलाने तुम्ही तुमचे दात चमकवू शकता. यासाठी थोडेसे नारळाचे तेल घेऊन 15 मिनिटे तोंडात ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरा. यामुळे फायदा होईल.


दात चमकवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे स्ट्रॉबेरीज. स्ट्रॉबेरीच्या गरात चिमूटभर बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण ब्रशवर घेऊन दात घासा. यामुळे दातांवरील पिवळेपणा दूर होईल.


अॅपल सिडार व्हिनेगरही दात चमकावण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याचे काही थेंब दातांवर चोळा. अधिक फायद्यासाठी सकाळी ब्रश करण्याआधी या व्हिनेगरने दात चोळा.