मुंबई : सध्या अनेकांना पोट मोठं असल्याच्या समस्या आहेत. पोटाची चरबी वाढल्यामुळे पोट वाढतं आणि त्यासोबत इतर आजारांनाही आपण आमंत्रण देत असतो. पोटातील चरबी वाढू नये म्हणून हे ५ उपाय करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. कमी प्रमाणात खा : जर तुम्हाला एकादाच भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोडं-थोडं खा.


२. गरम पाणी : पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे. यामुळे कॅलरीज कमी होतात. गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायल्याने ते आरोग्यासाठी आणखी लाभदायक ठरतं. 


३. मॉर्निंग वॉक : पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करा यामुळे पोटातील चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


४. योग : योगा केल्याने शारीरिकच नव्हे तर मानसिक तक्रारीदेखील दूर होतात. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे.


५. रात्री उशिरा जेवू नका : रात्री उशिरा जेवन करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवा. रात्रीचं जेवन खूपच लाइट असावं. झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका.