मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली हाय ब्लडप्रेशरचा त्रास अनेकांना जाणवतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयासंबंधित आजार, हार्ट अॅटॅक, किडनी निकामी होण्यासारखे आजार उद्भवतात. अनेक आजारांना निमंत्रण देणाऱ्या या हाय ब्लडप्रेशरच्या त्रासावर तुम्ही घरच्या घरी उपचार करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसूण : दररोजच्या जेवणात लसूणाचा समावेश करा. लसूण कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.


कांदा आणि मध - दिवसाची सुरुवात एक कप कांद्याचा रस आणि दोन चमचे मध यांच्या मिश्रणाने करा.


गाजर - दोन दिवसातून एकदा गाजर आणि पालकाचा रस घ्यावा. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


बीट - बीटाचा रस ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दोन दिवसातून एकदा तरी बीटाचा रस घ्या.