त्वचेवरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपचार
तेलकट त्वचा असल्यास अशा त्वचेवर ब्लॅकहेडची समस्या अधिक सतावते. योग्य उपचार केल्यास ब्लॅकहेड्स आपण घरच्या घरी दूर करु शकतो.
मुंबई : तेलकट त्वचा असल्यास अशा त्वचेवर ब्लॅकहेडची समस्या अधिक सतावते. योग्य उपचार केल्यास ब्लॅकहेड्स आपण घरच्या घरी दूर करु शकतो.
हे आहेत काही उपाय
गुलाबजल - ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी एका छोटा चमचा मीठ आणि एक चमचा गुलाबजल एकत्र मिसळा. लगेच हे मिश्रण ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. गुलाबजलामुळे चेहऱ्याची चमक वाढेल तसेच ब्लॅकहेड्सही साफ होतील.
साखर - एक चमचा साखरेत एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण घेऊन हलक्या हाताने नाकावर मसाज केला. १५ मिनिटानंतर हे सुकल्यानंतर पुसून टाका.
बेसन - एक चमचा बेसनमध्ये २ चमचे दूध आणि चिमूटभर मीठ मिसळा. ही पेस्ट ब्लॅकहेडवर लावा. १५ मिनिटे लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुवा.
टूथपेस्ट - ब्लॅकहेड्सवर टूथपेस्ट लावा त्यानंतर त्यावर थोडेसे मीठ टाकून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतील.
लिंबाचा रस - ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स आहेत तेथे लिंबाचा रस चोळा. त्यानंतर मीठ टाकून पुन्हा हलक्या हातांनी मसाज करा. १० मिनिटानंतर गरम पाण्याने चेहरा धुवा.
दही - ब्लॅकहेड्स झालेल्या ठिकाणी मिठाच्या पाण्याने मसाज केल्यानंतर १५ मिनिटांनी त्या जागी दही लावा आणि हलक्या हाताने पुन्हा मसाज करा. यामुळे ब्लॅकहेड्स साफ होतील.