मुंबई : आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ मिळणं तसं कठीणच. म्हणून मग पैसे भरून जिम जॉईन केली जाते. पण चुकीचा व्यायाम केल्याने गुडघ्यांवर भार येतो. मग आठ-दहा दिवसांतच जिमला जाणं तुम्ही सोडून देता. यामुळे जिमसाठी भरलेले पैसे वाया जातात आणि आरोग्याचीही हेळसांड होते.


हे होऊ नये यासाठी जिम जॉईन करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्यायामाची जास्त गरज आहे याचा विचार करून मगच व्यायाम निवडा. फिटनेस ट्रेनरकडून व्यवस्थित प्रशिक्षण घेतल्याशिवाय व्यायामाला सुरूवात करू नका. पहिल्या दिवसापासून संपूर्ण ताकद लावू नका. यामुळे गुडघेदुखीचा आजार होण्याची शक्यता आहे. सुरूवातीला ट्रेडमिलचा वेगही कमी ठेवा आणि हळूहळू सोयीनुसार वाढवत न्या. यामुळे गुडघ्यांवर भार येणार नाही. शिवाय एक्सरसाइज करण्यापूर्वी वॉर्मअप नक्की करा.