डोळ्याच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी
ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशा वेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
मुंबई : ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशा वेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
कम्प्युटर हाताळतांना
सतत कम्प्युटरच्या स्क्रिनकडे पाहणे टाळा. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे. दर ३० मिनिटाला ५ मिनिटांचा ब्रेक घ्या. सतत कम्प्युटरकडे पाहात राहू नका. काही सेंकद इतर लांबच्या वस्तूकडे पाहात जा.
डोळ्यांविषयीची समस्या
डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, सतत पाणी येणे यासारख्या समस्या जर तुम्हाला भेडसावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. यावर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोकेदुखीचा त्रास होत असल्यास डोळे तपासा. मधूमेही, रक्तदाबाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे गरजेचं आहे. ४० वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींनी आय प्रेशर तपासून घेणं गरजेचं आहे.
निरोगी डोळ्यांसाठी टीप्स
व्हिटामिन ए, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन सी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. नियमित डोळ्यांचे चेकअप करावे. युवी रे पासून रक्षण करणारे सनग्लास वापरावे.