...गर्भावस्थेत असा असावा आईचा आहार!
आई बनण्याचा अनुभव निराळाच... गर्भवती मातांनी गर्भावस्थे दरम्यान आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं... त्या जे खातात त्यातूनच त्यांच्या गर्भातील भ्रूणांना पोषण मिळतं, हे त्यांनी विसरता कामा नये. यासाठीच त्यांनी गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घेणं आणि पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे.
नवी दिल्ली : आई बनण्याचा अनुभव निराळाच... गर्भवती मातांनी गर्भावस्थे दरम्यान आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं... त्या जे खातात त्यातूनच त्यांच्या गर्भातील भ्रूणांना पोषण मिळतं, हे त्यांनी विसरता कामा नये. यासाठीच त्यांनी गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घेणं आणि पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे.
असा असावा पौष्टीक आहार...
प्रोटीन :
गर्भावस्थेदरम्यान मूल आणि प्लेसेंटाच्या विकासासाठी प्रोटीनयुक्त आहार गरजेचा असतो. थकवा दूर करण्यासाठी हे प्रोटीन्स शरीराला मदत करतात. एखाद्या महिलेला किती प्रोटीन्सची गरज आहे हे तिच्या वजनावर आधारित असतं. सी फूड, लीन मीट, डाळ, अंडी, दूध, बीन्स, शेंगदाणे हे प्रोटीन्सचे मुख्य स्रोत आहेत. 90 टक्के गर्भवती भारतीय महिलांमध्ये प्रोटीन्सची कमतरता आढळते... यासाठी, योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आयर्न :
शरीरात रक्ताची कमतरता आणि संक्रमणापासून वाचविण्यासाठी शरिरातील आयर्न मदत करतात. मूल आणि त्याच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. पूर्ण गर्भावस्थे दरम्यान अतिरिक्त 760 मिलीग्रॅम आयर्नची गरज असते. लीन मीट, स्कीनलेस चिकन, मासे, उकडलेली अंडी, डाळ, हिरव्या भाज्या, सुका मेवा, गहू यांसारख्या पदार्थांत आयर्न मोठ्या प्रमाणात असतं. शरीरातील आयर्नची कमी भरून काढण्यासाठी विटॅमिन सी युक्त फळांचं सेवन भोजन करताना किंवा भोजनानंतर त्वरती करणं फायदेशीर ठरतं. चहा घेतल्याच्या एक तासानंतर किंवा एक तासापूर्वी आयर्नयुक्त आहार घेणं टाळावं.
कॅल्शिअम :
आईच्या रक्तात कॅल्शिअमची कमतरता असल्यास मुलांच्या हाडांचा विकास होत नाही. मुलांचं हृदय, नसा आणि मांसपेशिंचा विकास कॅल्शिअमवर निर्धारीत असतो. आई योग्य प्रमाणात कॅल्शिअमचं सेवन करत नसेल तर मुलाचीही हाडं कमजोर राहतात. गर्भावस्थेदरम्यान दररोज 200 मिलीग्रॅम कॅल्शिअमयुक्त आहार घेणं गरजेचं आहे.
कॅल्शिअमसाठी स्किम्ड मिल्क, पनीर, दही, हाडं असणारे मासे (सार्डिन, टोफू), ब्रेड, चपाती, बदाम, संत्री, सुका मेवा, हिरव्या पालेभाज्या कॅल्शिअमच्या चांगल्या स्रोत ठरतात. कॅल्शिअम हा सर्वात जरुरी खुराक आहे. योग्य प्रमाणात विटॅमिन डी घेण्यानंही शरीरातील कॅल्शिअमचं प्रमाण संतुलित राहतं.